Sanjay Jagtap : पुरंदरमध्ये राजकीय उलथापालथ ; संजय जगताप भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत ?

Sanjay Jagtap : पुरंदरमध्ये राजकीय उलथापालथ ; संजय जगताप भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत ?

संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे पुरंदरमध्ये काँग्रेसला धक्का?
Published by :
Team Lokshahi
Published on

पुरंदर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार व सध्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले संजय जगताप लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे गट) आमदार विजय शिवतारे यांनी संजय जगताप यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर आता ते भाजपकडे वळत असल्याची चर्चा सुरू आहे.

संजय जगताप यांचे वडील, दिवंगत आमदार चंदुकाका जगताप यांनी काँग्रेस पक्षाची पाळंमुळं पुरंदरमध्ये रूजवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. स्थानिक स्वराज्य संस्था, दूध संघ, बाजार समित्या आणि सहकारी संस्थांवर जगताप कुटुंबाचा ठसा राहिला आहे. त्यामुळे संजय जगताप भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसची संघटनात्मक ताकद कमी होण्याची शक्यता आहे.

संजय जगताप भाजपमध्ये प्रवेश केल्यास, त्यांच्या समर्थकांमुळे पुरंदर तालुक्यात भाजपची ताकद अधिक बळकट होणार आहे. त्यामुळे काँग्रेसची घसरण होण्याबरोबरच सासवड आणि जेजुरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांवरही याचा स्पष्ट प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com