ताज्या बातम्या
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी
आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.
आज राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाने दडी मारली होती. मात्र आता पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.राज्याच्या काही भागांमध्ये ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्कचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अनेक दिवसाने परतलेल्या पावसाने उकाडा काहीसा कमी झाला आहे. येत्या २ ते ३ दिवसांमध्ये राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.