Rain Update : आज अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान खात्याने दिला अलर्ट

Rain Update : आज अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज; हवामान खात्याने दिला अलर्ट

राज्यात काही ठिकाणी अजून थंडीला सुरवात झाली नसताना अवकाळी पावसाने मात्र हजेरी लावली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात काही ठिकाणी अजून थंडीला सुरवात झाली नसताना अवकाळी पावसाने मात्र हजेरी लावली आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस झाला. हवामाना विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशात काही ठिकाणी पुढील 24 तासांत पावसाची शक्यता आहे.

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, काही भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूरमध्ये आज पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचे हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com