महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट आले आहे. राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात १५ आणि १६ मार्च रोजी अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलाय.हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत 16 ते 20 मार्च दरम्यान देशातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विविध भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने अनेक ठिकाणी येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.