Maharashtra Rain : राज्यात जोरदार पावसाला सुरुवात

Maharashtra Rain : राज्यात जोरदार पावसाला सुरुवात

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कामावर जाणाऱ्यांची या पावसाने चांगलीच कोंडी केली होती. मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली.

काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं होतं.या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com