In the Wake of this Crisis, Emergency Contact Numbers Have Been Issued for 17 Districts :
Weather update : पुढील 48 तास पावसाचा जोर कायम! 'या' 17 जिल्ह्यांना हायअलर्ट, सरकारकडून Helpline नंबर जारी Weather update : पुढील 48 तास पावसाचा जोर कायम! 'या' 17 जिल्ह्यांना हायअलर्ट, सरकारकडून Helpline नंबर जारी

Weather update : पुढील 48 तास पावसाचा जोर कायम! 'या' 17 जिल्ह्यांना हायअलर्ट, सरकारकडून Helpline नंबर जारी

महाराष्ट्रात पावसाने प्रचंड तांडव केला आहे, ज्यामुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.या संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्रात पावसाने प्रचंड तांडव केला आहे.

  • पुढील 24 तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

  • आयएमडीने राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला

  • या संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

In the Wake of this Crisis, Emergency Contact Numbers Have Been Issued for 17 Districts : महाराष्ट्रात पावसाने प्रचंड तांडव केला आहे, ज्यामुळे राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील 24 तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीने राज्यातील सात जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला असून, उर्वरित जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट लागू केला आहे.

हवामान खात्याच्या माहितीप्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी 48 तासांत पावसाची तीव्रता कायम राहण्याचा असा अंदाज व्यक्त केला आहे. आज मुंबई, ठाणे, जालना, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना पावसाचे रेड अलर्ट मिळाले आहेत, तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे संकेत आहेत. पावसासोबतच मोठ्या वादळाने आणि विजांच्या कडकडाटाने मोठं संकट निर्माण होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पुराची स्थिती गंभीर होऊ शकते, ज्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर 17 जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

संपर्क क्रमांक:

बीड – 02442-299299

लातूर – 02382-220204

धाराशिव – 02472-227301

नांदेड – 02462-235077

परभणी – 02452-226400

सोलापूर – 0217-2731012

पुणे – 09370960061

सातारा – 02162-232349

अहिल्यानगर – 0241-2323844

गडचिरोली – 07132-222031

कोल्हापूर – 02312-659232

रायगड – 08275152363

रत्नागिरी – 0705722233

सिंधुदुर्ग – 02362-228847

पालघर – 02525-297474

ठाणे – 09372338827

मुंबई शहर व उपनगर – 1916/022-69403344

तसंच, मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्राच्या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

1. 022-22027990

2. 022-22794229

3. 022-22023039

4. 09321587143

गरज असेल तर, घराबाहेर पडा सरकारचा इशारा...

दरम्यान पुढील काही तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जर पाऊस असाच राहिला तर पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे अति महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातच थांबा असं आवाहनही शासनच्या वतीनं करण्यात आलं आहे. राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असून, हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. याचा शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. शासनाकडून युद्धपातळीवर मदत सुरू करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com