Kishtwar Encounter : जम्मू-काश्मीरमधील चकमकीत महाराष्ट्रातील सुपुत्राला वीरमरण

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत महाराष्ट्राचा एक शिपाई शहीद झाला.
Published by :
Rashmi Mane

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत महाराष्ट्राचा एक शिपाई शहीद झाला. सिंगपोरा-छत्रू भागात झालेल्या या चकमकीत अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. या कारवाईत दोन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याच 2 पॅरा, 11 राष्ट्रीय रायफल्स, 7 आसाम रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाने संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 3-4 दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com