Weather Update : मुंबईला आज यलो अलर्ट; मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, IMDने वर्तवला अंदाज

Weather Update : मुंबईला आज यलो अलर्ट; मेघगर्जनेसह पावसाचा इशारा, IMDने वर्तवला अंदाज

उन्हाचा कडाका वाढला आहे. नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

उन्हाचा कडाका वाढला आहे. नागरिक उकाड्याने चांगलेच हैराण झाले आहेत. यात आता मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मुंबईला आजपासून पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील 3 दिवस पावसामुळे तापमानात किंचित घट होईल. अशी माहिती मिळत आहे.

मुंबईचे कमाल तापमान गेल्या काही दिवसांपासून 33 आणि 34 अंश सेल्सिअस दरम्यान स्थिर असले, तरी आर्द्रता अधिक नोंदविली आहे. त्यामुळे दोन दिवसांमध्ये आर्द्रता आणखी वाढल्यास काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com