राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. विविध मुद्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल.

तीन वर्षांच्या खंडानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशन होतंय.. पहिल्याच दिवशी सरकारच्या बाजूने अध्यादेश आणि पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळण्यावर भर असणार आहे.हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. नागपुरात पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com