Mahavikas Aaghadi Seat Sharing
Mahavikas Aaghadi Seat Sharing

ठरलं! मविआचा जागावाटपाचा तिढा सुटला, 'असा' आहे फॉर्म्युला, कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा सविस्तर

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय येथे पार पडली. यावेळी मविआने लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला.
Published by :

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद शिवालय येथे पार पडली. यावेळी मविआने लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला. काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागांवर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या जागा - १७

नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - १०

बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, माढा, बीड, दिंडोरी, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

शिवसेना - २१

जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी, बुलडाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई इशान्य

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com