गडचिरोलीतून महायुतीचा उमेदवार अखेर ठरला;  अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर

गडचिरोलीतून महायुतीचा उमेदवार अखेर ठरला; अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर गडचिरोलीत अखेर महायुतीचा उमेदवार ठरला आहे. गडचिरोली मतदारसंघातून अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दिल्लीत अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अशोक नेते यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला.

यावर प्रतिक्रिया देताना अशोक नेते म्हणाले की, आमची सुद्धा महायुती आहे. सर्व आम्ही एकत्र आहोत. सर्व एकत्र मिळून आम्ही लढणार आहोत त्याच्या फायदा आणि मी केलेलं काम देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं काम यामुळेच मी प्रचंड मताने, जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी प्रचंड मताने निवडून येईन याची मला खात्री आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com