Breaking News : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई; संशयित दहशतवादी बीएसएफच्या ताब्यात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Breaking News) सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयित दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह ताब्यात घेतलं आहे. जम्मू-काश्मीरच्या प्रागवाल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडून होणारा घुसखोरीचा कट जवानांनी उधळून लावला असून संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे.
बीएसएफच्या जवानांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची ओळख अब्दुल खालिक अशी झाली असून तो मूळचा राजोरुई जिल्ह्यातील दारहल भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
ही कारवाई करण्यात आल्यानंतर सुरक्षा दल आणखी अलर्ट झालं आहे. संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आल्यानंतर आता त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
Summery
सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई
जम्मू-काश्मीरच्या प्रागवाल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न
घुसखोरीचा कट उधळला, सुरक्षा दलाची कारवाई
