Pimpri-Chinchwad : "एक चूक अन् थेट 25 हजारांची दंडात्मक कारवाई", पिंपरी-चिंचवड महापालिका अॅक्शन मोडवर
पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक वापरणे पडू शकतं महागात. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत प्लास्टिक वापरल्यास 3 महिन्यांसाठी कारावास भोगावा लागणार एवढचं नाही तर तीन टप्प्यांमध्ये 5 ते 25 हजारांची दंडात्मक कारवाई देखील करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्लास्टिकमुक्त पिंपरी-चिंचवड या मोहीमवर जोर धरला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या परिसरा प्लास्टिकमुळे कोणताही कचरा होऊन आरोग्य विस्कळीत होऊ नये.
यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग 'ह क्षेत्रीय कार्यालया' अंतर्गत नवी सांगवी येथील साई चौक भाजी मार्केट येथे प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याचसोबत 'ड क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत लक्ष्मीनगर येथील झिरो प्लास्टिक, प्लास्टिक फ्री झोन, सिंगल यूज प्लास्टिक, प्लास्टिकचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे विपरीत परिणाम या संबंधित लोकांना माहिती देण्यात आली आहे. तसेच तीन टप्प्यात आलेली दंडाची तरतूद अशी आहे की, जर पहिल्या वेळेस प्लास्टिक वापरल्यास त्या व्यक्तीला 5 हजार रु. दंड बजावण्यात येणार, तर दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यास त्या व्यक्तीला 10 हजार रु. दंड बजावण्यात येईल, आणि तिसऱ्यांदा वापर केल्यास त्या व्यक्तीला 25 हजार रु. दंड तसेच 3 महिन्यांची कारावास करण्यात येणार आहे.
याबद्दल अधिकची माहिती देत असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार म्हणाले की, "प्लास्टिक पिशव्यांचा वापर पर्यावरणास हानीकारक असून, त्याच्यामुळे कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील विक्रेते व ग्राहक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येत आहे, असं म्हणत त्यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर टाळून कापडी पिशवीचा वापर करावा", असे आवाहनही केले आहे.
तसेच पिंपरी-चिंचवडचे अतिरिक आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, "सरकारने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातलेली असताना देखील प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे, त्यामुळे हा कायदेशीर गुन्हा आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये. आपले शहर प्लास्टिकमुक्त होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. यासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विक्रेत्यासह ग्राहकांवर दंडात्मक कारवाई सोबतचं कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे".