Nana Patole : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट, नाना पटोले यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
थोडक्यात
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट
8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
(Nana Patole) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली. हा स्फोट एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या दुकानांच्या काचाही फुटल्या. या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे आजूबाजूच्या तीन गाड्यांना आग लागल्याची घटना घडली.
हा स्फोट नेमका कसा झाला? याचा तपास आता घेतला जात आहे. लाल किल्ला परिसरात मेट्रोच्या गेट क्रमांक एकवर एक कार उभी होती. याच कारमध्ये हा स्फोट झाला. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की," पुलवामामधील घटना झाली, पहलगाममधील घटना झाली. त्याच्यात आम्ही पूर्ण सरकारच्यासोबत होतो. पण ज्या पद्धतीने सरकारने पहलगामच्या घटनेमध्ये राजकारण केलं. ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूरच्या नावाने देशाच्या लोकांना आता पाकिस्तान आपल्याकडे डोळे उघडून बघणार नाही अशा पद्धतीची जी भूमिका मांडलेली होती ती कुठे गेली."
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. केंद्र सरकारचं हे अपयश आहे. केंद्र सरकारने याची जबाबदारी स्विकारावी. निवडणुका लढणे आणि पक्ष जिंकवणे अशा पद्धतीची त्यांची भूमिका असते,देश हित आणि सुरक्षेबद्दल त्यांच्याजवळ कुठलाही प्लॅन नाही." असे नाना पटोले म्हणाले.
