Colombia Plane Crash
ताज्या बातम्या
Colombia Plane Crash : कोलंबियात मोठा विमान अपघात; लँडिंगच्या आधी विमान कोसळले, एका खासदारासह 15 जणांचा मृत्यू
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले.
(Colombia Plane Crash) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताने परिसरात काही काळ धुराचे लोट पसरले होते.
अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले. या घटनेला काही तास झाले असतानाच आता पुन्हा एक मोठा विमान अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
कोलंबियामध्ये भीषण विमान अपघात झाला असून ही घटना व्हेनेझुएलाजवळ घडली आहे. या विमान अपघातात एका कोलंबियन खासदारासह 15जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या विमान अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
