Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मोठी अपडेट; आरोपी मिहीर शाह याला अटक

Worli Hit And Run: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मोठी अपडेट; आरोपी मिहीर शाह याला अटक

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
Published by :
Dhanshree Shintre

वरळी येथे हिट अँड रन अपघाताची धक्कादायक घटना घडली होती. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वाहानाने धडक दिली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्यासोबत असलेला पुरुष गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान याच बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. अपघात झाल्यानंतर मिहीर शाह फरार झाला होता. मिहिर शाहच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी11 पथके स्थापन केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शहापूरमधून आरोपी मिहीर शाहला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांमध्ये आरोपी मिहीर शाहच्या आईचा आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या 12 जणांनी आरोपी मिहीर शाहला पळून जाण्यास मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणी मिहीर शाह यांचे वडील राजेश शाह यांना अटक करण्यात आली होती. यानंतर राजेश शाह यांना 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर कालच जामीन मंजूर झाला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com