Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती 14 की 15 जानेवारी? तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व सविस्तर जाणून घ्या...
मकर संक्रांत हा भारतातील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. हा सण अनेक शतकांपासून साजरा केला जात असून तो केवळ उत्सव नसून नव्या सुरुवातीचं प्रतीक मानला जातो. या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि याच खगोलशास्त्रीय बदलाला संक्रांत म्हटलं जातं.
मकर संक्रांतीचं खास महत्त्व
मकर संक्रांतीचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी केलेली पूजा, दान आणि जप लवकर फलदायी ठरतात, अशी श्रद्धा आहे. पुराणकथांनुसार भीष्म पितामहांनी याच शुभ काळात देहत्याग केला होता. त्यामुळे या दिवसाचा संबंध मोक्ष आणि पुण्याशी जोडला जातो. पवित्र नदीत स्नान केल्याने मनःशांती आणि शुद्धता मिळते, असं मानलं जातं.
या दिवशी तिळगूळ, धान्य, अन्न आणि वस्त्रदानाला विशेष महत्त्व आहे. तीळ हे शनीदेवाशी संबंधित मानले जात असल्याने शनीदोष कमी करण्यासाठी हा दिवस लाभदायक मानला जातो. देशाच्या वेगवेगळ्या भागांत हा सण पोंगल, लोहडी, भोगाली बिहू अशा नावांनी साजरा केला जातो.
मकर संक्रांत 2025– महत्त्वाची माहिती
दिनांक : 14 जानेवारी 2025 (बुधवार)
महापुण्य काळ: सकाळी 8:40 ते 9:04
पुण्यकाळ: सकाळी 8 :42 नंतर
स्नानाचा उत्तम वेळ: सकाळी 9 :03 ते 10 :48
यंदा मकर संक्रांतीला षटतिला एकादशीचा योग असल्याने या दिवशी सूर्यदेव आणि भगवान विष्णूची पूजा अधिक फलदायी मानली जाते. एकादशीला भात न खाता दानधर्म केल्यास विशेष पुण्य मिळतं, असं सांगितलं जातं. मकर संक्रांत हा सण गोडवा, सकारात्मकता आणि नव्या आशांचा संदेश देतो—म्हणूनच “तिळगूळ घ्या, गोड गोड बोला!”

