Aloo Bhujia
Aloo Bhujia

Aloo Bhujia : दिवाळीत घरच्या घरी तयार करा आलू भुजिया; जाणून घ्या रेसिपी

दिवाळीत घरोघरी फराळ तयार केला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Aloo Bhujia) दिवाळीत घरोघरी फराळ तयार केला जातो. ज्यामध्ये चकली, लाडू, चिवडा, करंजी असे अनेक पदार्थ असतात. अनेक प्रकारच्या मिठाया देखील घरी तयार केल्या जातात. तुम्ही या दिवाळीत घरच्या घरी आलू भुजिया देखील बनवू शकता. चला तर जाणून घेऊया आलू भुजिया कशी बनवायची.

आलू भुजिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

बटाटा - 2

बेसन - दीड वाटी

तांदळाचे पीठ - अर्धी वाटी

जिरे पावडर - अर्धा टीस्पून

चाट मसाला - 1 टीस्पून

हळद - 1/4 टीस्पून

गरम मसाला - अर्धा टीस्पून

लाल तिखट - 1 टीस्पून

आमचूर - अर्धा टीस्पून

तेल - प्रमाणानुसार तळण्यासाठी

मीठ - चवीनुसार

आलू भुजिया बनवण्यासाठी आधी बटाटे उकडून सोलून घ्या. एका भांड्यात बटाटा किसून घ्या आणि त्यात बेसन, तांदळाचे पीठ घालून सर्व साहित्य चांगले मिसळा. आता त्यात जिरे पावडर, गरम मसाला, चाट मसाला, हळद, लाल तिखट आणि आमचूर पावडर घालून चांगले मॅश करा. यानंतर चवीनुसार मीठ घालून 2 चमचे तेल घालून मिक्स करा.

भुजिया बनवण्यासाठी साचा घ्या आणि त्या भांड्याला तेल लावा. यानंतर एक कढई घ्या, त्यात तेल टाका आणि गरम करा. तेल गरम झाल्यावर भुजियाच्या साच्यात तयार पीठ भरा आणि कढईत भुजिया सोडा. भुजियाचा रंग सोनेरी तपकिरी होऊन कुरकुरीत होईपर्यंत तेलात तळून घ्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com