Chocolate Appe : बच्चे कंपनीसाठी करा आता 'हा' खास पदार्थ
सध्या उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे बच्चे कंपनी घरात आहे. या दरम्यान आई काहीतरी चांगले खायला बनव असे प्रत्येकांच्या घरी ऐकू येणारे वाक्य आहे. घरातील आईला आता पडणारा मोठा प्रश्न म्हणजे आज काय बनवायचे? आजच बनवा हेल्दी आणि टेस्टी चॉकलेट आप्पे
साहित्य
बारीक रवा २ कप
मीठ- चवीनुसार
तूप १ टेबलस्पून
कोको पावडर- ४ टेबलस्पून
साखर- १ कप
दही- १ कप
दूध - १ कप
बेंकिग पावडर- १/२ टेबलस्पून
बेंकिग सोडा- १/२ टेबलस्पून
व्हॅंनिला इन्सेंस - ४-५ थेंब
तेल आवश्यतेनुसार
चॉकलेट सॉस -आवश्यतेनुसार
चॉकलेट स्प्रेड- आवश्यतेनुसार
कृती
सगळ्यांत आधी एक मोठा बाऊल घेऊन त्यात बारीक रवा, तूप, चवीनुसार मीठ, कोको पावडर, साखर असे सगळे पदार्थ एकत्रित घेऊन ते चमच्याने हलवून मिक्स करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात दही, दूध घालून सगळे मिश्रण चमच्याने पुन्हा मिक्स करून घ्या.
आप्पे पात्र गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यावे. त्यानंतर या आप्पे पात्रात थोडे तेल सोडून मग आप्प्याचे तयार मिश्रण यात सोडावे. नंतर व्यवस्थित झाकून ५ ते १० मिनीटांत आप्पे दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. मस्त चॉकलेटी आप्पे खाण्यासाठी तयार आहेत. हे तयार आप्पे चॉकलेट सॉस किंवा चॉकलेट स्प्रेड सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावेत.