Maldives Fire: मालदीवची राजधानी मालेमध्ये अग्नितांडव

Maldives Fire: मालदीवची राजधानी मालेमध्ये अग्नितांडव

मालदीवची राजधानी माले येथे भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ९ भारतीयांसह १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

मालदीवची राजधानी माले येथे भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ९ भारतीयांसह १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तब्बल चार तासांनंतर आग आटोक्यात आली असून आगीत अनेक जण जखमी झाले आहेत.

मालदीवची राजधानी मालेमध्ये आज गुरुवारी विदेशी कामगारांच्या घरांना आग लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास लागले. कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

भारतीय उच्चायुक्तांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माले येथे लागलेल्या आगीच्या घटनेने खूपच दुःखी आहोत. भारतीय नागरिकांसह अनेक लोकांचा बळी त्यात गेला आहे. मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मदतीसाठी उच्चायुक्तांनी हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केले आहेत.

Maldives Fire: मालदीवची राजधानी मालेमध्ये अग्नितांडव
विरोधी पक्षाच्या नेत्यांना ठरवून तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न - महेश तपासे

दरम्यान या आगीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये एका बांगलादेशी नागरिकाचाही समावेश आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com