Malegaon Blast Case : 'PM मोदींचे नाव घेण्यासाठी टॉर्चर केले'...साध्वी प्रज्ञा यांचा खळबळजनक वक्तव्य
NIA न्यायालयाचा हा निकाल भारतातील सर्वाधिक वादग्रस्त दहशतवादी खटल्यांपैकी एका प्रकरणावर कायदेशीर टोक आणतो. मात्र, ठाकूर यांच्या नव्या आरोपांमुळे या प्रकरणातील सुरुवातीच्या तपासाच्या पद्धतीबाबत पुन्हा एकदा चर्चा आणि चौकशी होण्याची शक्यता आहे.
मालेगाव येथे झालेल्या 2008 साली बॉम्बस्फोट प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. 2 दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्था (NIA) च्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. ज्यामुळे तब्बल 17 वर्षांपासून सुरु असलेल्या कायदेशीर लढ्याचा शेवट झाला. निर्दोष मुक्तात झालेल्या भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी चौकशीदरम्यान आपल्या वागणुकीबाबत धक्कादायक आरोप केला. त्यांनी दावा केला की, तपास यंत्रणांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला आणि बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले.
त्यावेळी त्या म्हणाले की, “माझ्यावर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुरेश (सुदर्शन), इंद्रेश कुमार आणि राम माधव यांची नावे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली,” असं त्यांनी म्हटलं. “त्यांनी मला सांगितलं की, मी जर या लोकांची नावं घेतली, तर मला त्रास दिला जाणार नाही. त्यांचा हेतू मला मानसिकरित्या खचवण्याचा आणि खोटे कबूल करून घेण्याचा होता. पण मी कोणाचंही नाव घेतलं नाही.”