Mamata Banerjee
Mamata Banerjee

Mamata Banerjee : 'केंद्र सरकारने केरळचे नाव बदलून केरळम् केले, पण...'; ममता बॅनर्जींचा केंद्राला सवाल

केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mamata Banerjee) केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आणि सांगितले की, भाषेच्या आधारे राज्याचे नाव बदलण्याच्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी राज्याचे नाव अधिकृतपणे बदलण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. २५ जून २०२४ रोजी केरळ विधानसभेत हा प्रस्ताव दुसऱ्यांदा एकमताने मंजूर करण्यात आला.

यापूर्वी २०२३ मध्ये देखील यासंबंधी प्रस्ताव मांडण्यात आला होता. मल्याळम भाषेत राज्याचा उच्चार नेहमीच ‘केरळम’ असा केला जातो, त्यामुळे अधिकृत दस्तऐवज, सरकारी कामकाज आणि संविधानाच्या अनुसूचीमध्येही हा बदल आवश्यक असल्याचे सरकारचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने केरळचे नाव बदलून केरळम् केले, पण पश्चिम बंगालचे नाव 'बांगला' करण्याबाबत दिरंगाई करत असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला असून बंगाललाच नेहमी अन्यायाचा सामना का करावा लागतो, असा सवाल देखील ममता बॅनर्जी यांनी विचारला आहे.

Summary

  • केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे

  • या निर्णयावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रिया

  • पश्चिम बंगालचे नाव 'बांगला' करण्याबाबत दिरंगाई का ममता बॅनर्जींचा केंद्राला सवाल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com