मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. .
Published by :
Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मनोज जरांगे यांनी गोरी-गंधारी गावी मतदान केलं आहे. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाजाने 100टक्के मतदान करणं आवश्यक आहे. लोकशाहीचा मोठा देशातला उत्सव आहे. याच्यामध्ये आपण आजारी असलो तरी एक कर्तव्य आपण नागरिक म्हणून पार पाडलं पाहिजे. तेच मी आज केलं.

मराठा समाजाने 100टक्के यावेळेस मतदान करायचे आहे आणि सगळ्या जनतेनं पण करायचं आहे. परंतु करताना एक लक्षात असू द्या की, आपलं लेकरंसुद्धा डोळ्यासमोर असलं पाहिजे. आपल्या लेकरांना हक्कासाठी, न्यायासाठी लागतंय ते ही डोळ्यासमोर ठेवायचं. मी सांगतानाच सांगितलेलं तुम्ही कोणालाही मतदान करा. मी म्हणणार नाही की, तुम्ही याला करा किंवा त्याला करा. समाजाच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे यावेळेस. एक गोष्ट खरी आहे की, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यांच्या बाजूने असणाऱ्यांना मात्र सहकार्य करावं.

यासोबतच ते म्हणाले की, जरी आपण कुठला उमेदवार अपक्षही दिलेला नाही, कुणाला पाठिंबाही दिलेला नाही. नसला तरी पाडण्यातसुद्धा खूप मोठा विजय आहे. उभा राहावं किंवा उमेदवारी अर्ज दाखल करावा असं काही नाही पाडण्यात खूप मोठा विजय आहे. यावेळेस पाडणारे बना. आपला उमेदवार नसल्यामुळे कोणालाही करा परंतु आपल्या सगासोयऱ्यांची अंमलबजावणीच्या बाजूने असला पाहिजे. यावेळेस इतकं ताकदीने पाडा पाडणाऱ्याला की त्याच्यानंतर त्याच्या 5 पिढ्यातरी उभ्या नाही राहिल्या पाहिजे. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com