Manoj Jarange : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मनोज जरांगे मोठं वक्तव्य; म्हणाले...
(Santosh Deshmukh Case) बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील आल्या. राज्यात तणाव निर्माण झाला होता. संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंना सहआरोपी करा,असे मराठा समाजाचे समर्थनक मनोज जरांगे यांनी भाष्य केले आहे.
अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पार पडणार आहे. बीडच्या विशेष मकोका कोर्टात ही सुनावणी पार पडणार असून आजची ही 19वी सुनावणी असणार आहे. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 12 डिसेंबर होणार आहे. मनोज जरांगेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी.. क्रूर हत्या करणाऱ्याची आठवण येणं म्हणजे ती व्यक्तीही तितकीच क्रूर असल्याची टीका केली आहे.
