ताज्या बातम्या
Operation Sindoor : 'अभी पिक्चर बाकी है', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख Manoj Naravane यांचं सूचक ट्विट
भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.
भारतीय सैन्यदलानं (Indian Army) पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. भारताविरोधात दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी करण्याची योजना तयार करण्यात आली त्या 9 ठिकाणांवर हल्ले करण्यात आले.
भारताकडून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor ) अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला. भारतीय सैन्याने पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या 15 दिवसांनी ही कारवाई केली.
याच पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी सूचक ट्विट केलं आहे. मनोज नरवणे म्हणाले की, 'अभी पिक्चर बाकी है'. यातच आता मनोज नरवणे यांच्या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलं आहे.