Digipravesh : मंत्रालय आता HighTech ; मिळणार डिजिटल प्रवेश, जाणून घ्या
सर्वत्र डिजिटलायझेशन होताना दिसून येत आहे. आता या प्रणालीचा वापर मंत्रालयामध्ये केला जाणार आहे. यापुढे कोणत्याही कामाकरिता प्रवेश हवा असल्यास त्यांना ‘डिजीप्रवेश’ या ऑनलाईन ॲप आधारित प्रणालीद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे.
काय आहेत नियम ?
काम असणाऱ्या व्यक्तींना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे केवळ त्यांना दिलेल्या वेळेत प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या मजल्याची परवानगी असेल केवळ त्याच मजल्यावर प्रवेश मिळणार आहे. या शिवाय प्रवेश केल्यास त्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. मंत्रालयात आलेल्या व्यक्तीचे त्या विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर दिलेल्या वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :
डिजीप्रवेश या ऑनलाईन ॲपवरुन प्रवेशपास घेऊन मंत्रालयात कोणालाही प्रवेश मिळणार आहे. मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.स्मार्टफोन नसलेल्या व्यक्तींना गार्डन गेट येथे ऑनलाईन ॲप आधारीत प्रणालीद्वारे मंत्रालय प्रवेश नोंदणीकरीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असणार आहे.