CM Fadnavis On Ajit Pawar
CM Fadnavis On Ajit Pawar CM Fadnavis On Ajit Pawar

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोमणा म्हणाले की '....अनेकांना कंठ फुटतात'

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला.
Published by :
Riddhi Vanne
Published on

CM Fadnavis On Ajit Pawar : राज्यात सध्या चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्या शाब्दिक वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोमणा मारला. यावेळी ते म्हणाले की, 'निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात' तसेच अजित पवारांवर टीका करताना फडणवीसांची शेरोशायरी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांच्या शाब्दिक वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार महेश लांडगे यांना मोलाचा सल्ला दिला. इथले विरोधक वैतागले आहेत,म्हणूनच ते अशा पद्धतीने बोलत आहेत.

आपण आपलं काम शांतपणे करत राहावं,ते रागावले म्हणून आपण रागावू नये,असा मोलाचा सल्ला त्यांनी महेश लांडगे यांना दिला.याचवेळी एसआरए प्रकल्पात धमकी देणाऱ्यांवरही मुख्यमंत्री फडणवीसांनी कडक शब्दांत इशारा दिला.धमकी देणाऱ्याला त्याची जागा दाखवायला पिंपरी-चिंचवड पोलीस पूर्णपणे सक्षम आहेत,असं सांगत १६ तारखेनंतर या प्रकरणात स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. चिंचवडमधील जाहीर सभेतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळीस त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शायरीतून उत्तर दिले म्हणाले की, "फरिंदे को मिलेगी मंजिल ये उनके फंक बोलतेते है, वही लोग राहते है खखमोश जिनेक. काम बोलते है" असे फडणवीस म्हणाले आहेत.

थोडक्यात

'निवडून आल्यावर अनेकांना कंठ फुटतात'..

मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोमणा..

अजित पवारांवर टीका करताना फडणवीसांची शेरोशायरी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com