Raksha Bandhan PM Modi : राख्यांनी सजलेले मनगट, मुलांसोबत आनंद… पंतप्रधान मोदींचे खास रक्षाबंधन
रक्षाबंधनाचा सण देशभरात आज आनंद आणि उत्साहात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी एक हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. अनेक शालेय मुली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीस आल्या आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधली. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी मुलींशी संवाद साधत, त्यांच्यासोबत खेळत आनंदाचा क्षण साजरा केला.
सकाळीच पंतप्रधान मोदींनी सामाजिक माध्यमांवरून देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, हा सण बंधुभाव, स्नेह आणि विश्वासाचा उत्सव आहे जो समाजात आत्मीयतेची नवी उब निर्माण करतो. पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि आनंदाने वातावरण अधिक उत्साही झाले होते.
या खास दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही जनतेला शुभेच्छा दिल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रक्षाबंधनाला “भाऊ-बहिणीच्या प्रेमाची जिवंत अभिव्यक्ती” असे संबोधून, हा धागा केवळ कलाईच नव्हे तर मनालाही जोडतो असे म्हटले.
पंतप्रधान निवासातील हा प्रसंग सणाच्या मूळ भावनेला अधोरेखित करणारा होता, बंधुभाव, प्रेम, आणि विश्वास यांचा संगम जणू पाहिला मिळाला. मुलांसोबतचा हा स्नेहपूर्ण क्षण देशभरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरला.