राज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता; मंगल प्रभात लोढा यांचे वक्तव्य

राज्यातील अनेक तरुणी लव्ह जिहादमुळे बेपत्ता झाल्याची शक्यता; मंगल प्रभात लोढा यांचे वक्तव्य

अफताब नामक नराधमाने श्रद्धा वाळकर या तरुणीची ज्याप्रकारे निर्घृण हत्या केली.

अफताब नामक नराधमाने श्रद्धा वाळकर या तरुणीची ज्याप्रकारे निर्घृण हत्या केली, तसेच महाराष्ट्रातील अनेक तरुणी प्रेमाच्या जाळ्यात अडकून बेपत्ता झाल्या आहेत, अशी शक्यता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे. तसेच या पार्श्वभूमीवर बेपत्ता मुली व महिलांचा शोध घेण्यासाठी महिला आयोगाद्वारे विशेष पथक नेमले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य महिला आयोग व जिल्हा विधी प्राधिकरण, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित होत्या.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com