Mira-Bhayandar Municipal Corporation
Mira-Bhayandar Municipal Corporation

Mira-Bhayandar Municipal Corporation : आज मिरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती आणि मनसेचा एल्गार; कारण काय?

मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपने दुसर्‍यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Mira-Bhayandar Municipal Corporation) मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपने दुसर्‍यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड केली आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेल्या डिंपल मेहता या दुसर्‍यांदा महापौरपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिरा- भाईंदर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी कोकण विभागीय आयुक्तालयातर्फे 3 फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महापौरपदी मराठी उमेदवाराची निवड करावी, अशी मागणी मराठी एकीकरण समिती व मनसेने केली आहे.

मराठी उमेदवार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. महापौर मराठीच असावा यासाठी आज सकाळी 10 वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

Summary

  • मिरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपने दुसर्‍यांदा डिंपल मेहता यांच्या नावाची निवड

  • आज मिरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समिती आणि मनसेचा एल्गार

  • मराठी उमेदवार नसेल, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com