Pune : महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पुण्यात होणार मराठी  साहित्य संमेलन

Pune : महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी पुण्यात होणार मराठी साहित्य संमेलन

पुणे-अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 19वे अखिल भारतीय प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 19 वे अखिल भारतीय प्रबोधन मराठी साहित्य संमेलन 23 नोव्हेंबर 2025 रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिली आहे.

खानवडी,सोलापूर, आमगाव,वर्धा आदी ठिकाणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते,समतेचे प्रणेते स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रसार व प्रसार व्हावा, म्हणून या साहित्य संमेलनाचे आयोजन दरवर्षी विविध ठिकाणी करण्यात येते,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पुणे येथे बैठक पार पडली या बैठकीत या निवड सर्वोनुमते करण्यात आली यावेळी परिषदेच्या राष्ट्रीय सचिव सुवर्णा पवार,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी काळभोर,राष्ट्रीय विश्वस्त द्यानेश्वर पतंगे.

सुप्रसिद्ध ग्रामीण कवी किशोर टिळेकर,महाराष्ट्र उपाध्यक्ष दत्तात्रय भोंगळ,महाराष्ट्र सरचिटणीस सुनील लोणकर,संतोष शेलार,महाराष्ट्र संघटक सचिव अमोल कुंभार, पुणे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत नामुगडे,पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे,पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष प्रतिभा मगर,पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष सुमेध गायकवाड,सरचिटणीस सुवर्णा वाघमारे,मराठवाडा उपाध्यक्ष तुकाराम गंगावणे,शहराध्यक्ष द्यानेश्वर धायरीकर,जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर, प्रा.सुरेश वाळेकर,मधुकर गिलबिले,पुणे विभागीय सरचिटणीस शर्मिला गायकवाड,आदी जण उपस्थित होते,

ग्रंथपूजनाने या संमेलनाची सुरुवात होणार असून त्यानंतर उद्घाटन समारंभ,पुरस्कार वितरण,परिसंवाद कविसंमेलन असे संमेलनाचे स्वरूप असणार आहे देशभरातून मोठ्या संख्येने साहित्यिक या संमेलनास उपस्थित राहणार आहेत,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विविध 19 साहित्य संमेलनं देशभरात साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या नेतृत्वात आयोजित केली जातात,हे 188 साहित्य संमेलन आहे इतकी साहित्य संमेलनं आयोजित करणारी साहित्य विश्वातील हि एकमेव साहित्य संस्था आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com