Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie:
Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या नव्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार 'हा' चेहरा; पोस्ट शेअर म्हणाला की,...Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie: रितेश देशमुखच्या नव्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार 'हा' चेहरा; पोस्ट शेअर म्हणाला की,...

Riteish Deshmukhs 'Raja Shivaji' Movie: रितेश देशमुखच्या नव्या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार 'हा' चेहरा; पोस्ट शेअर म्हणाला की,...

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात कपिल होनरावची एंट्री, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आनंदाची बातमी.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला.

  • छावा चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

  • रितेश देशमुखच्या अभिनयातील आणि दिग्दर्शनातील 'राजा शिवाजी'. या चित्रपटाकडे फक्त महाराष्ट्रचं नाही, तर देशभरातून लक्ष वेधलं जात आहे.

Marathi Actor In Riteish Deshmukhs Raja Shivaji Movie: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला. छावा चित्रपटाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आगामी काळात देखील उच्च दर्जाच्या चित्रपटांचा प्रेक्षकांच्या समोर येण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यापैकी एक चित्रपट म्हणजे रितेश देशमुखच्या अभिनयातील आणि दिग्दर्शनातील 'राजा शिवाजी'. या चित्रपटाकडे फक्त महाराष्ट्रचं नाही, तर देशभरातून लक्ष वेधलं जात आहे.

रितेश देशमुख सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' या चित्रपटावर काम करत आहे. खास गोष्ट म्हणजे, या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील रितेश स्वतः करत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. रितेश या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून, अन्य अनेक प्रसिद्ध कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत.

अशा परिस्थितीत आता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात मराठी टेलिव्हिजनच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याची एंट्री झाली आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करुन या बाबतीत माहिती दिली आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात मराठी मालिकांतील प्रसिद्ध अभिनेता कपिल होनराव दिसणार आहे. कपिलने त्याच्या अभिनयाची छाप विविध मालिकांमध्ये सोडली आहे. मात्र, त्याला खऱ्या लोकप्रियतेची झलक 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून मिळाली. आता रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटात भाग मिळाल्यामुळे कपिलला अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

कपिल होनरावने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. त्याने पोस्टमध्ये लिहिलं, "2024 हे वर्ष माझ्यासाठी थोडं कठीण होतं, पण घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आईला प्रार्थना केली होती की, येणाऱ्या नवरात्रेत काही मोठं होईल. आणि आज त्या प्रार्थनेचं फळ मिळालं. माझे आदर्श रितेश विलासराव देशमुख यांच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा मी एक भाग होतोय."

"माझं कास्टिंग मराठीतील सर्वात मोठ्या कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर यांनी केलं आणि मला स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लहानपणापासून योगदान देणाऱ्या मावळ्याची भूमिका दिली आहे. आज या पोस्टद्वारे मी तुम्हाला हे खास क्षण शेअर करत आहे. घटस्थापनेच्या दिवशी सुरू होणाऱ्या नवरात्रात आपल्याला सुख, शांती आणि प्रेम मिळो, हीच कामना करतो. आपल्याला नवरात्रीच्या शुभेच्छा!". अशा प्रकारे कपिल होनरावने आपल्या आगामी भूमिकेची माहिती दिली असून, त्याच्या या नवा पर्वाच्या सुरुवातीला त्याला अनेक शुभेच्छा मिळत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com