मोठा निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, शाळांमध्ये आता मराठी...

शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार
Published by :
Team Lokshahi

सध्या सर्वत्र मराठी भाषेचा मुद्दा गाजताना दिसत आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील मॅनेजरने एका व्यक्तीला मराठी न बोलण्याची अरेरावी केली. जर बोलायचं असेल तर हिंदी किंवा गुजराती भाषेत बोला असंही मॅनेजर म्हणाला. या सगळ्या प्रकारांवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातील नेत्याने मॅनेजरला चांगलाच धडा शिकवला आणि संबंधित मॅनेजरला मराठी भाषेमध्ये माफी मागायला लावली.

अशातच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करणार असल्याचे संगितले आहे. सर्व शाळांमध्ये मराठी सक्तीने शिकवली जाणार असल्याचे ही ते म्हणाले. त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी बोलणं तसेच शिकणंदेखील अनिवार्य ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com