ताज्या बातम्या
बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ पंढरपुरात आज जन आक्रोश मोर्चा
पंढरपुरात आज जन आक्रोश मोर्चा
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज पंढरपुरात मराठा समाज आणि बहुजन समाजाच्यावतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनआक्रोश मोर्चाची तयारी पूर्ण झाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्यावतीने भव्य असा मोर्चा पंढरपूरातून आज सकाळी 11 वाजता निघणार आहे.
मोर्चानंतर सभा होणार आहे. या सभेसाठी मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदिप क्षिरसागर आणि देशमुख कुटुंब, सूर्यवंशी कुटुंबातील सदस्य या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.