दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती! विनामास्क फिरल्यास 500 रुपये दंड

दिल्लीत पुन्हा मास्कसक्ती! विनामास्क फिरल्यास 500 रुपये दंड

दिल्लीत कोरोना परतला असून रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोना परतला असून रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. तर मास्क न घातल्यास ५०० रुपये दंडही भरावा लागणार आहे. यासंबंधीचे वृत्त एनआयए या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दिल्लीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून मृत्यूचा आकडाही वाढत आहे. हे लक्षात घेता दिल्ली सरकारने सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केले आहेत. तसेच, मास्क न लावल्यास ५०० रुपये दंड जारी केला आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, खासगी कारमधून प्रवास करणाऱ्यांना मास्कसक्तीतून सुट आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 2146 रुग्ण आढळले आहेत. तर 8 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीतील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 15.41 टक्के होता. केवळ ऑगस्टमध्येच दिल्लीत कोरोनामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत 26,351 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये ओमिक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 उप-प्रकारांची प्रकरणे आढळून आली आहेत. हे संसर्ग खूप वेगाने पसरतात. BA.5 मधील ऑमिक्रॉन प्रकार सर्वात संसर्गजन्य व्हायरस आहे. अलीकडेच एका संशोधनातून असे दिसून आले आहे की BA.5 इतर प्रकारांच्या तुलनेत सहज पसरतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com