Ayodhya Blast
Ayodhya Blast

Ayodhya Blast : अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू

ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट

  • घर कोसळून 5 जणांचा मृत्यू

  • ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

(Ayodhya Blast) अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत घर कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अयोध्येतील पूराकलंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पगला भारी गावात ही घटना घडली असून घरातील घरगुती गॅस सिलेंडर फुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये समोर येत आहे.

हा स्फोट एवढा भीषण होता की आजूबाजूच्या घरांचं आणि दुकानांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत असून बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम हाती घेतलं आहे.

परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.गॅसची गळती झाल्याने स्फोट होऊन ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही घटना कशी झाली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com