Kolkata Fire
ताज्या बातम्या
Kolkata Fire : कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Kolkata Fire ) कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
अग्निशमन दलाकडून 2 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दुपारी तीन वाजता ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यात 20 जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत असून अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी आग विझवण्यासाठी दाखल झाल्या.
Summary
कोलकाताच्या नाझिराबादमध्ये गोदामाला भीषण आग
7 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी
