Mumbai Ghatkopar Fire : घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग; धुराच्या लोटात 200 लोकांना वाचवण्यात यश

Mumbai Ghatkopar Fire : घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग; धुराच्या लोटात 200 लोकांना वाचवण्यात यश

घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रविशा टॉवर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली.
Published by :
Prachi Nate
Published on

घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या रविशा टॉवर या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील ही इमारत कमर्शियल टॉवर आहे, त्यामुळे इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी होते, तसेच इमारतीच्या खाली दुचाकी व चारचाकी गाड्यांची पार्किंग देखील होती. आगीची घटना घडलयानंतर घटनास्थळी अजून अग्निशमन दलाची गाडी येण्यास विलंब झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्मण झालं आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानक नजीक असलेल्या रविशा टॉवर या १३ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली होती. या कर्मशियल इमारतीमध्ये दोनशेपेक्षा जास्त लोक अडकले होते. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना सुखरुप बाहेर काढल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलास यश आले असून इमारतीमधील 13 व्या मजल्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर इमारत ही पूर्णपणे काचांनी बंदिस्त असल्याने आग आतमध्ये धुमसत होती. तसेच, धुराचे लोटही मोठ्या प्रमाणात आतमध्ये पसरल्याचं दिसून आलं. साधारण 200 ते 300 लोकांना या इमारतीमधून बाहेर काढण्यात आलं आहे. मजल्यावर मोठ्या प्रमाणात धूर असल्याने अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात अडथळा निर्माण होत होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com