माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप, नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद

माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप, नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद

माथाडी कामगारांचा आज राज्यव्यापी संप
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र शासनाकडे माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्रतील माथाडी कामगारांनी लाक्षणिक संप पुकारला आहे. या लाक्षणिक संपात मुंबईत विविध ठिकाणी काम करणारे माथाडी कामगार देखील सहभागी होणार आहेत.

माथाडी कामगारांच्या राज्यव्यापी बंदमुळे नवी मुंबईतील पाचही एपीएमसी मार्केट बंद आहेत. पहाटे सुरु होणाऱ्या भाजीपाला मार्केटमधेही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com