MC Election Special Report : कोणत्या मनपात किती नगरसेवक होणार? नवे प्रभाग कुणाला फळणार?
नवी प्रभाग रचना काय सांगते?
अ, ब, क वर्ग मनपांची प्रभाग रचना करण्याचे आदेश
पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड मनपांचा समावेश
नवी मुंबई, वसई विरार, छ. संभाजीनगर, कडोंमपाचा समावेश
मुंबई मनपाच्या प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असणार
इतर महापालिकांत प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक असणार
ड वर्ग मनपात प्रत्येक प्रभागात तीन ते पाच नगरसेवक होणार
ड वर्गामध्ये 19 महानगरपालिकांचा समावेश केला जाणारयेत्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणारेत. त्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्यात. त्यातच आता, राज्य सरकारने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्या महापालिकेच्या, कोणत्या प्रभागात किती नगरसेवक असणार? हे आता लपून राहिलेलं नाही. पाहूयात, याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट
नवी प्रभाग रचना काय सांगते?
अ, ब, क वर्ग मनपांची प्रभाग रचना करण्याचे आदेश
पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड मनपांचा समावेश
नवी मुंबई, वसई विरार, छ. संभाजीनगर, कडोंमपाचा समावेश
मुंबई मनपाच्या प्रत्येक प्रभागात एक नगरसेवक असणार
इतर महापालिकांत प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक असणार
ड वर्ग मनपात प्रत्येक प्रभागात तीन ते पाच नगरसेवक होणार
ड वर्गामध्ये 19 महानगरपालिकांचा समावेश केला जाणार
याचाच अर्थ, मुंबई वगळता इतर महापालिकांच्या प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक होणार असून, मुंबईत मात्र प्रत्येक प्रभागाला एक नगरसेवक होणारेय. तर पुण्यासारख्या महापालिकांमध्ये प्रत्येक प्रभागात 4 नगरसेवक होणारेत. अनेक मुद्द्यांमुळे महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. त्यामुळे बहुतांश महापालिकांचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे. मात्र आता निवडणुका होणारेत. म्हणूनच प्रभाग रचनांचे आदेश देण्यात आलेत. मात्र ही रचना कोणत्या पक्षाला फळणार आणि कोणत्या पक्षाचा घात होणार? याबाबतची चुरस चांगलीच वाढलीय.