Media Excellence Award : मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025; महाराष्ट्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार

Media Excellence Award : मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025; महाराष्ट्रातील मान्यवरांचा विशेष सत्कार

मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025, 3 जूनला हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे, महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
Published by :
Prachi Nate
Published on

प्रसारमाध्यमे ही समाजाचा महत्त्वाचा भाग बनली आहेत. ती फक्त माहितीचा स्रोत नसून समाजाचे प्रतिबिंब, आणि दिशादर्शक आहेत. योग्य व जबाबदारीने त्यांचा वापर केला गेला, तर ती लोकशाहीच्या हितासाठी मोलाची ठरू शकतात. माध्यमांच्या बहरलेल्या वटवृक्षाच्या जडणघडणीत आजवर असंख्य सुवर्णहातांचं योगदान लाभलं आहे. पडद्यावर आणि पडद्यामागं राहूनही काही चेहऱ्यांनी केलेली कामगिरी ही सुवर्णमोलाची आहे. माध्यमांना वेगळा आयाम देण्यात या व्यक्तींचा खूप मोलाचा वाटा आहे.

या परीसरूपी हातांचं कौतुक होणं आज गरजेचं आहे. माध्यमांच्या आजच्या जडणघडणीचा अविभाज्य घटक असलेल्या आणि या वर्षी विशेष प्रभावशाली ठरलेल्या कला, सामाजिक, राजकारण अशा विविध विभागांमध्ये आपला जोरदार ठसा उमटवणाऱ्या मान्यवर दिग्ग्ज व्यक्तींच्या कार्याचा गौरव 'माई मीडिया 24' प्रस्तुत 'मीडिया असोशिएशन ऑफ इंडिया'च्या 'मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स 2025 ' देऊन केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे सहकारी प्लॅनेट मराठी असून, येत्या 3 जूनला हा पुरस्कार सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क दादर येथे रंगणार आहे.

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना साहित्य क्षेत्रातील -ऐतिहासिक कार्यासाठी मीडिया एक्सलन्स एवाँर्ड 2025 ने गौरविण्यात येणार आहे. तर प्रा. राम शिंदे, सभापती (विधान परिषद), मा. ना. श्री.एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री), पद्मश्री महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते श्री.अशोक सराफ, अभिनेते श्री. विजय पाटकर (माजी अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), नीलम शिर्के - सामंत (अध्यक्ष, बालरंगभूमी परिषद) आदि मान्यवरांचा 'विशेष सत्कार' या पुरस्कार सोहळ्यात केला जाणार आहे.

त्यासोबत सयाजी शिंदे (सामाजिक कार्य - निसर्ग संवर्धन), प्रसाद गावडे (रानमाणूस - उद्योग, पर्यटन क्षेत्र योगदान ), सुजाता रायकर ( आरोग्य क्षेत्र - थॅलेसेमिया मुक्ती दूत), डॉ. प्रदिप ढवळ (साहित्यक्षेत्र - सांस्कृतिक योगदान), ,अँड. संगिता चव्हाण (स्त्री सक्षमीकरण - सामाजिक कार्यकर्त्या), संतोष पवार ( सांस्कृतिक क्षेत्र- लोककला संवर्धन), वैदेही परशुरामी ( लक्षवेधी अभिनेत्री) नीतिन केळकर (पत्रकारिता जीवनगौरव), अनन्या गोयंका ( शिक्षण क्षेत्र - सामाजिक कार्य), किशोर आपटे (वरिष्ठ पत्रकार), मोहन बने ( ज्येष्ठ छायाचित्रकार), श्रीकांत बोजेवार ( ज्येष्ठ पत्रकार सल्लागार, महाराष्ट्र टाइम्स), संजीव भागवत (संशोधक पत्रकार दै. सकाळ), विशाल पाटील (संपादक,लोकशाही मराठी वृत्तवाहिनी), प्रेरणा जंगम ( पत्रकार सकाळ प्रीमियर), श्वेता वडके (वृत्तनिवेदिका, न्यूज 18 लोकमत), रविराज इळवे (कामगार कल्याण कार्य -महाराष्ट्र कामगार कल्याण आयुक्त) यांना मीडिया एक्सलन्स एवाँर्ड २०२५' ने सन्मानित करण्यात येणार आहे.

या सोहळ्याला कला सामजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर पुरस्कार प्रदान करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मान्यवर कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रंगदार होणार आहे. हा केवळ पुरस्कार सोहळा नसून थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र, मराठी भाषा, उद्योग, शेतकरी निसर्ग संवर्धन, पर्यावरण पर्यटन या विषयी जागर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचे समन्वयक - संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर, कार्याध्यक्ष - सचिन चिटणीस, कपिल देशपांडे, व्यवस्थापन/तांत्रिक - चेतन काशीकर, लक्ष्मीकांत घोणसे पाटील, कलाविभाग - गणेश तळेकर, सुरज खरटमल, विजय कांबळे आहेत.

प्लॅनेट मराठीचे सहकार्य या पुरस्कार सोहळ्याला लाभले आहे. समाजमाध्यम क्षेत्रातील स्वतंत्र पत्रकार व फोटो जर्नालिस्टस यांचे प्रसारमाध्यम असून; देशपातळीवर प्रसारमाध्यमांच्या सर्वसमावेशक विकास, सन्मान व सक्षमीकरणासाठी आधारस्तंभ असणारी 'मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया' (माई) ही संस्था सामाजिक, आरोग्य, सांस्कृतिक आदि विषय केवळ बातमीतून न मांडता सक्रीय सहभाग घेण्याचे काम करतेय. लोकजागर चळवळ यातून 'उभी होतेय अशी ही माई आहे. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा शीतल हरीष करदेकर आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com