Media Excellence Award : मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025: महाराष्ट्रातील मान्यवरांचा सन्मान
महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक असे हस्ती आहेत ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची मान देशातच नाही तर संपूर्ण जगभरात उंचावली आहे. त्यामुळे आशा व्यक्तींचा सन्मान करणे ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. आशा दिग्गजांचा सत्कार-सन्मान करण्याचे शिवधनुष्य माई मीडियाने हाती घेतलं आहे.
'माई मीडिया' प्रस्तुत आणि 'मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'च्या वतीने मीडिया एक्सलन्स पुरस्कार 2025 पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, तसेच बालरंगभूमीच्या अध्यक्षा नीलमताई शिर्के-सामंत यांचा विशेष सत्कार होणार आहे.
त्याचप्रमाणे कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पद्मश्री विजेते, महाराष्ट्र भूषण अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचादेखील सन्मान होणार आहे. हा सोहळा दादर येथील वीर सावरकर सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मंगळवार 3 जून दुपारी 3 वाजता पार पडणार आहे.