Meenakshi Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठा वाद; मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

Meenakshi Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठा वाद; मिनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

ठाणे महापालिका निवडणूक जवळ आल्यावर ठाण्यात शिवसेनेत मोठा वाद घडला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

ठाणे महापालिका निवडणूक जवळ आल्यावर ठाण्यात शिवसेनेत मोठा वाद घडला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना सांगितले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे या पदावर कार्य करण्यास ते असमर्थ आहेत. मात्र, यामागे मोठे राजकारण चालू असल्याची चर्चा आहे.

मिनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, विशेषत: ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे आता ते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मिनाक्षी शिंदे यांची नाराजी

भूषण भूईरे, माजी नगरसेवक, यांना पुन्हा तिकीट मिळवू नये यासाठी काही शाखाप्रमुखांनी आंदोलन केले होते. यामध्ये विक्रांत वायचळ यांचं नाव चर्चेत आहे. वायचळ हे मिनाक्षी शिंदे यांचे जवळचे सहकारी आहेत. शिवसेनेने विक्रांत वायचळ यांना पक्षविरोधी कारवायांच्या कारणास्तव प्रभाग क्रमांक 3, मनोरमा नगर शाखेतील प्रमुखपदावरून हकालपट्टी केली. यानंतर शिवसेनेत नाराजीचं वातावरण तयार झालं. त्यातूनच मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

विक्रांत वायचळ यांची हकालपट्टी झाल्यामुळे मिनाक्षी शिंदे नाराज झाल्या होत्या, असं समजलं जातं. ठाण्यात महापालिका निवडणूक जवळ असताना मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेत काय घडामोडी होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com