Mega Block : २८ डिसेंबरला मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

Mega Block : २८ डिसेंबरला मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार, २८ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या काही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवार, २८ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या काही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवेवर होणार असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी वेळापत्रकाची माहिती घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या कालावधीत जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल गाड्या साधारणपणे १० ते १५ मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.

याशिवाय हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि बांद्रा स्थानकांदरम्यान अप व डाउन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या काळात सीएसएमटी ते चुनाभट्टी तसेच बांद्रा ते गोरेगावदरम्यानची हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी या कालावधीत कुर्ला स्थानकातून पनवेलच्या दिशेने विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत.

दरम्यान, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि पर्यटक येतात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने चार तर पश्चिम रेल्वेने आठ स्पेशल लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी–कल्याण, कल्याण–सीएसएमटी, सीएसएमटी–पनवेल आणि पनवेल–सीएसएमटी या चारही स्पेशल लोकल रात्री १.३० वाजता धावणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट–विरार–चर्चगेट मार्गावर रात्री उशिरापर्यंत आठ स्पेशल लोकल चालविण्यात येणार असून त्यामुळे नववर्ष साजरे करून घरी परतणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेच्या चार स्पेशल लोकल

सीएसएमटी-कल्याण : रात्री १.३० वाजता

कल्याण-सीएसएमटी : रात्री १.३० वाजता

सीएसएमटी-पनवेल : रात्री १.३० वाजता

पनवेल-सीएसएमटी: रात्री १.३० वाजता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com