Mega Block
Mega BlockTeam Lokshahi

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्या सकाळी 11 ते दुपारी पावणे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकमधून सुटका झाली आहे. लोकलच्या सर्व सेवा सुरळीत सुरू राहतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने पत्रकाद्वारे दिली आहे.

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ब्लॉक (बेलापूर/नेरुळ-खारकोपर लाईन वगळून)

पनवेल/बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com