Megablock: होळीला रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Megablock: होळीला रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ऐन होळीच्या दिवशी मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक नसेल.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. याशिवाय ठाणे येथून धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर देखील रविवारी सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. यामुळे वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील.

दरम्यान, देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी घेण्यात येणारे मेगाब्लॉक हे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असतात. जेणेकरून रेल्वे सेवा सुरळीत सुरू राहावी हा त्यामागील मुख्य उद्देश असतो. प्रवाशांना विनंती करण्यात येते की, त्यांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com