Mumbai Metro : 'या' प्रवाश्यांसाठी 1 मेपासून 25 टक्के सवलत लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Mumbai Metro : 'या' प्रवाश्यांसाठी 1 मेपासून 25 टक्के सवलत लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले

मुंबई मेट्रोने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना मुंबई मेट्रोने खूश खबर दिली आहे. येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग प्रवाशांना 45 ट्रिप किंवा 60 ट्रिपसाठी पासवर ही सवलत मिळेल. ही सवलत मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणाऱ्या श्रेणीतील हजारो प्रवाशांना मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही मुंबई मेट्रो नेटवर्क तयार केले आहे, त्यामुळे त्यांना या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ मिळणे आवश्यक आहे. आम्ही यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत केला आहे. तर महिलांना सुद्धा एसटी बसेसमधून 50 टक्के तिकीट दरात प्रवासाची सवलत दिली आहे. सामाजिक भावनेतून हा निर्णय घेतला आहे. मेट्रो प्रवासातील या सवलतीमुळे देखील अधिक संख्येने लोक यातून प्रवास करतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Mumbai Metro : 'या' प्रवाश्यांसाठी 1 मेपासून 25 टक्के सवलत लागू; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
भाऊ जिंकला, बहीण हरली! पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का

ही सुविधा 65 वर्षांवरील वरिष्ठ नागरिक, इयत्ता बारावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी आणि दिव्यांग लोकांसाठी आहे. या तीन श्रेणीतील प्रवाशांना सवलतीसाठी काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com