MHADA Lottery : म्हाडाचा मोठा निर्णय; पुढील 5 वर्षांत 7 लाख नवी घरे बांधली जाणार
MHADA Lottery : म्हाडाचा मोठा निर्णय; पुढील 5 वर्षांत 7 लाख नवी घरे बांधली जाणार MHADA Lottery : म्हाडाचा मोठा निर्णय; पुढील 5 वर्षांत 7 लाख नवी घरे बांधली जाणार

MHADA Lottery : म्हाडाचा मोठा निर्णय; पुढील 5 वर्षांत 7 लाख नवी घरे बांधली जाणार

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी घेऊन आले आहे. पुढील 5 वर्षांत तब्बल 7 लाख नवी घरे बांधण्याचा महत्वकांक्षी आराखडा म्हाडाने तयार केला आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

  • महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी

  • पुढील 5 वर्षांत तब्बल 7 लाख नवी घरे बांधण्याचा महत्वकांक्षी आराखडा म्हाडाने तयार केला आहे.

  • या निर्णयामुळे मुंबई आणि आसपासच्या भागांतील परवडणाऱ्या घरांच्या तुटवड्यावर मोठ्या प्रमाणात उपाय होणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी घेऊन आले आहे. पुढील 5 वर्षांत तब्बल 7 लाख नवी घरे बांधण्याचा महत्वकांक्षी आराखडा म्हाडाने तयार केला आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि आसपासच्या भागांतील परवडणाऱ्या घरांच्या तुटवड्यावर मोठ्या प्रमाणात उपाय होणार आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, या 7 लाख घरांपैकी साडेपाच लाखांहून अधिक घरे मुंबई महानगर प्रदेशातच बांधली जातील. ही सर्व घरे विविध गृहनिर्माण योजनांखाली विकसित करण्यात येणार असून, त्यांची विक्री पारदर्शक लॉटरी प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

मुंबईतील सायनमधील GTB कॉलनी, अंधेरीतील SVP नगर, गोरेगावमधील मोतीलाल नगर, आणि मुंबई सेंट्रलजवळील कामाठीपुरा या भागांमध्ये क्लस्टर पुनर्विकासाचे प्रकल्प सध्या सुरू आहेत. या प्रकल्पांमुळे पुढील 5 ते 7 वर्षांत सुमारे 2 लाख नवी घरे तयार होण्याची अपेक्षा आहे. मुंबईतील लोकसंख्या वाढ, झपाट्याने होणारं शहरीकरण आणि वाढत्या रिअल इस्टेट किमतींमुळे परवडणाऱ्या घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या या नव्या उपक्रमामुळे मध्यमवर्गीय आणि निम्न उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाने गेल्या तीन वर्षांत 13,500 हून अधिक घरे विकली आहेत. राज्यभरात म्हाडाने 18 लॉटरी सोडतींद्वारे सुमारे 43,000 घरे नागरिकांना दिली आहेत. म्हाडाचा हा मोठा निर्णय महाराष्ट्रातील गृहनिर्माण क्षेत्राला नवसंजीवनी देणारा ठरणार असून, मुंबईकरांसाठी परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com