Mhada Lottery 2025: बाप्पा पावला ! म्हाडाच्या 5,285 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ
Mhada Lottery 2025: बाप्पा पावला ! म्हाडाच्या 5,285 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज Mhada Lottery 2025: बाप्पा पावला ! म्हाडाच्या 5,285 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Mhada Lottery 2025: बाप्पा पावला ! म्हाडाच्या 5,285 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

म्हाडा लॉटरी 2025: 5,285 घरांसाठी अर्जाची अंतिम मुदत 12 सप्टेंबरपर्यंत वाढली, अर्जदारांना संधी!
Published by :
Riddhi Vanne
Published on

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) कोकण मंडळामार्फत जाहीर केलेल्या 5,285 घरांच्या आणि 77 भूखंडांच्या लॉटरी प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. याअंतर्गत अर्ज नोंदणीची अंतिम मुदत आता 12 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून, अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा 13 सप्टेंबरच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच RTGS/NEFT द्वारे भरणा करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

सोडतीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार असून, सोडत 9 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काढली जाईल, अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.

आतापर्यंत अर्जदारांचा प्रतिसाद

28 ऑगस्ट दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 1,49,948 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 1,16,583 अर्ज अनामत रकमेच्या भरण्यासह नोंदले गेले आहेत.

लॉटरीतील घरं आणि भूखंडांचे तपशील

एकूण सदनिका : 5,285

20% समावेशक गृहनिर्माण योजना : 565

15% एकात्मिक शहरी गृहनिर्माण योजना : 3,002

कोकण मंडळ गृहनिर्माण योजना : 1,677

कोकण मंडळ परवडणारी गृहनिर्माण योजना : 51

भूखंड : 77 (ओरोस-सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर येथे)

ही लॉटरी ठाणे, वसई, कुळगाव-बदलापूर आणि सिंधुदुर्ग या भागातील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी लागू आहे. अर्जदारांना दावे व हरकती 24 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याची संधी मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com