Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiTeam Lokshahi

Delhi Riots : धार्मिक मिरवणुकीत शस्त्रांची गरज काय? दंगलीनंतर ओवैसींचा सवाल

परवानगी शिवाय मिरवणूक का काढू दिली? ओवैसींचा दिल्ली पोलिसांना सवाल
Published by :
Sudhir Kakde

दिल्ली : दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर (Jahangirpuri Riots) देशातील वातावरण ढवळून निघालं आहे. हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर काही लोकांनी दगडफेक (Delhi Riots) केल्यानंतर इथे मोठी दंगल उसळली. यावेळी दगडफेक, जाळपोळ आणि मोठा हिंसाचार झाला. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Asaduddin Owaisi
Covid 19 : उत्तर प्रदेशात पुन्हा संसर्ग वाढला; सात जिल्ह्यांत मास्क सक्ती

असदुद्दीन ओवैसी यांनी या प्रकरणावर बोलताना दिल्ली पोलिसांना सवाल केले आहेत. ओवैसी म्हणाले, "दिल्ली पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, जहांगीरपुरीमध्ये काढण्यात आलेल्या शोभायात्रेसाठी परवानगी घेतली नव्हती. या यात्रेत हत्यारं होती, गावठी पिस्तुलं होती धारदार शस्त्र होती. तसंच वादग्रस्त घोषणा दिल्या जात होत्या. हे सगळं होत असताना पोलीस डोळे लावून बसले होते असं ओवैसी म्हणाले.

Asaduddin Owaisi
Raj Thackeray इफेक्ट : धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरसाठी परवानगी लागणार

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, जर तुम्हाला धार्मिक शोभायात्रा काढायची असेल, तर तुम्ही हत्यारं का बाळगत होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका मशिदीवर झेंडा लावण्याचा प्रयत्न का झाला असा सवाल ओवैसींनी केला. तसंच हे सर्व होत असताना पोलीस काय करत होते असंही त्यांनी विचारलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com